गीता सुगीता  कर्तव्या  किम्  अन्यैः  शास्त्रविस्तरैः ।

या  स्वयम्  पद्मनाभस्य  मुखपद्माद्  विनिःसृता ॥

श्रीमद्भगवद्गीतेचे चांगल्या प्रकारे वाचन, मनन आणि आचरण केले पाहिजे. गीतेच्या सखोल अध्ययनानंतर इतर अनेक शास्त्रांच्या आणि ग्रंथांच्या पसाऱ्याची किंवा अभ्यासाची गरजच काय?
कारण, गीता ही साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या (पद्मनाभाच्या) मुखकमलातून प्रकट झालेली आहे. चिरंतन, अविनाशी, शाश्वत, अभिजात भारतीय तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या श्रीमद्भगवद्गीतेचा सविस्तर आणि व्यापक अभ्यास आता आपण सुरू करूया.

शुभास्ते पन्थानः सन्तु । = शुभाः ते पन्थानः सन्तु

शब्दशः अर्थ:तुझे (ते) सर्व मार्ग (पन्थानः) मंगलमय (शुभाः) असोत (सन्तु).

भावार्थ: तुम्ही जो नवीन प्रवास सुरू करत आहात, त्या मार्गात तुम्हाला कोणतेही विघ्न न येता

तुमचा तो प्रवास सुरक्षित, यशस्वी आणि आनंदी ठरो.